शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कारची नुकसान भरपाई मागायला गेला, टोळक्याने धारदार शस्त्राने जीव घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 21:02 IST

अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे....

पुणे : रस्त्याने जाताना कारला दुसरी गाडी घासल्याने वादावादी झाली. त्यानंतर नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाला ७ ते ८ जणांनी धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अभिषेक यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास सकट (वय ३१, रा. चंदवाडी, फुरसुंगी) याच्यासह ७ ते ८ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार फुरसुंगीतील चंदवाडी येथे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक भोसले हे फर्निचरचे काम करतात. ते स्विफ्ट गाडी घेऊन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शेवाळवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होते. त्यावेळी दुसरी गाडी येऊन त्यांच्या कारला घासली. यावरून विलास सकट याच्याशी त्यांची वादावादी झाली. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. नुकसान भरपाई घेण्यासाठी अभिषेक भोसले हे चंदवाडी येथे गेले असताना विकास सकट व इतर ७ ते ८ जणांनी त्यांच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकाला ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधासाठी २ पथके रवाना झाली आहेत. पोलिस नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी