शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला भेटायला निघाले अन् काळाने घाला घातला; अष्टविनायक महामार्गावर वडिलांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:07 IST

अष्टविनायक महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून अनेक जणांनी प्राण गमावले आहेत.

कवठे येमाई : मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत शिवाजी मारुती जाधव ( वय ६५ वर्ष ) रा.पिंपरखेड यांच्या टू व्हीलरला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे.

शिवाजी जाधव हे पिंपरखेडवरुन कवठेमार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे भेटायला होंडा शाईन मोटारसायकलवरून चालले होते. अष्टविनायक महामार्गावर रावडेवाडी येथील पराग अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला आहे. मोटारसायकलचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठ्याच्या बाजूने येणारी वाहने दिसत नाही. तसेच सदर ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने वळण घेताना अपघात होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने पळत आहे. वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालवणे गरजेचे असून स्पीड बेकर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गडदरे,सरपंच भाऊसाहेब किठे, व नागरीकांनी केली आहे.याच महामार्गावर भाऊसाहेब चव्हाण रा. शिरसगाव काटा यांचा दि. २२ एप्रिल रोजी टू व्हीलरवर शिंदेवाडीतील पीराचा दर्गा येथे अपघातात जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची मालिका सुरू असून या रस्त्यावर अनेक जणांचे जीव गेले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूPoliceपोलिस