अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार करून विहिरीत फेकले; बारामती शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 11:35 IST2020-04-11T11:34:36+5:302020-04-11T11:35:32+5:30
आरोपीने मुलाच्या गळ्यावर,मानेवर धारदार हत्याराने वार करत त्यास विहिरीत ढकलून खून करण्याचा प्रयत्न केला.

अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार करून विहिरीत फेकले; बारामती शहरातील घटना
बारामती : बारामती शहरात 16वर्षीय अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून विहिरीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (दि 10) सायंकाळी घडली. याप्रकरणी सलीम मुनिर कुरेशी (वय 45, रा. कसाबगल्ली,बारामती ता.बारामती जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपी आयुब गुलाब कुरेशी ( रा कसाबगल्ली,बारामती ता बारामती जि.पुणे.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपीला अटक करण्यात आली आहे .लॉकडाऊन काळात घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुरुडगल्ली येथील काटयात आड या विहिरीजवळ हा प्रकार घडला.आरोपी फिर्यादीच्या घराशेजारी वास्तव्यास आहे. आरोपीने अज्ञात कारणावरुन कैफ कुरेशी यास बाहेर जावुन येवु असे म्हणुन त्यास त्याचे बरोबर घेऊन गेला . त्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विहिरीजवळ नेले .या ठिकाणी आरोपीने कैफ याच्या गळ्यावर ,मानेवर धारदार हत्याराने वार केले .वार केल्यानंतर त्यास विहिरीत टाकुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करत आहेत .