शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

"माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" म्हणत प्रियकरावर प्राणघातक हल्ला; विश्रांतवाडी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:09 PM

लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत कोयत्याने डोक्यात सपासप वार केले.

विश्रांतवाडी: बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून भाऊ वडील व साथीदारांनी प्रियकरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री धानोरी येथे घडली. या घटनेत राजू गौतम भिसे (वय 25, भैरवनगर धानोरी) याच्या डोक्यात कोयता व लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले आहे.याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.  याबाबत तरुणाची आई सुनिता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, आशिष मोरे, जीवन परीयार या चार आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजू याचे प्रतीक याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. "माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" या कारणावरून चिडून जाऊन प्रतीक व त्याचे वडील सुनील यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. राजू याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईला देखील आरोपींनी मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे निरीक्षक मनिषा झेंडे घटनास्थळी भेट दिली.  तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते तपास करीत आहेत.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीPoliceपोलिस