Weapon attack on youth due to love relationship with sister; Incident at Vishrantwadi | "माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" म्हणत प्रियकरावर प्राणघातक हल्ला; विश्रांतवाडी येथील घटना 

"माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" म्हणत प्रियकरावर प्राणघातक हल्ला; विश्रांतवाडी येथील घटना 

विश्रांतवाडी: बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून भाऊ वडील व साथीदारांनी प्रियकरावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री धानोरी येथे घडली. या घटनेत राजू गौतम भिसे (वय 25, भैरवनगर धानोरी) याच्या डोक्यात कोयता व लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले आहे.याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 
 
याबाबत तरुणाची आई सुनिता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, आशिष मोरे, जीवन परीयार या चार आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजू याचे प्रतीक याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. "माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" या कारणावरून चिडून जाऊन प्रतीक व त्याचे वडील सुनील यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. राजू याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईला देखील आरोपींनी मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे निरीक्षक मनिषा झेंडे घटनास्थळी भेट दिली.  तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते तपास करीत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Weapon attack on youth due to love relationship with sister; Incident at Vishrantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.