शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 18:03 IST

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करायचा असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही

इंदापूर: ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो, अशा शब्दात शरद पवार यांनी आज (दि.५) विरोधकांना सज्जड इशारा दिला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा झाली.    शरद पवार पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील द्राक्ष शेती करणारांची आमच्या पक्षाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. मात्र तसे केल्यास त्यांच्या शेतीचे पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. शेतीचे पाणी हे काही बापजाद्याची इस्टेट नाही. कुणी नोकरी टिकणार नाही म्हणतात. दमदाटी व दहशतीने त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही जणांना शक्ती व पाठिंबा देण्याची गरज असते, तशी भूमिका आम्ही घेतली. आज त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. पाय आणि डोके हवेत आहे, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता अजित पवार व आ. दत्तात्रय भरणे यांचा समाचार घेतला.

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करण्याची आज आवश्‍यकता आहे. ती यशस्वीपणे करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा आहे. त्यांना भाजपला सत्तेतून बाजुला करुन नव्या विचारांच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे. सर्वांच्या सामुदायिक शक्तीने आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल यात काही शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.    सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दौंड व इंदापुरात पाण्याबद्दल प्रचंड उलट-सुलट भाषणे होत आहेत. कुणी ही पाण्याची धमकी दिली, तर त्याचा नंबर मला पाठवा. हे कुणाच्या घरचं पाणी नाही.तो राज्याचा विषय आहे.पाण्यावर सरकारचा नाही, तर देशातील शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे. चारशे पारच्या निमित्ताने संविधान बदलण्याचे पाप विरोधकांच्या मनात आहे.यातून पाणी बंद करू वगैरे भाषणे होत आहेत, अशा त्या म्हणाल्या.   अमोल कोल्हे म्हणाले की, नीती व नियत गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शरद पवार यांनी शेतक-यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. तर भोपाळ मध्य  पंतप्रधान्ह नरेंद्र मोदी यांनी कुठल्या तरी वेगळ्या विषयात ७० हजाराचा आकडा सांगितला त्यावर काहींनी आपली भूमिका बदलली.मात्र दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानाने लढतो, हे अनिल देशमुख यांनी दाखवून दिले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाAjit Pawarअजित पवार