आम्ही फटाके फोडणार नाहीत; विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:28 PM2017-10-14T12:28:45+5:302017-10-14T12:34:01+5:30

प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने वारजे परिसरातील ४ शाळांनी पुढाकार घेतला असून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

We will not break the fireworks; Sworn to celebrate Diwali without pollution-free students | आम्ही फटाके फोडणार नाहीत; विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

आम्ही फटाके फोडणार नाहीत; विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदुषणास आळा बसण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जात आहे. काही शाळा मागील काही वर्षापासून दर वर्षी दिवाळीला संकल्प अभियान राबवीत आहेत.

वारजे : प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७ अंतर्गत वारजे परिसरातील चार शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र जमत प्रदुषणमुक्त दिवाळी साजरे करणार असल्याची शपथ घेतली. यंदा प्रदूषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून त्यास प्रतिसाद देत या चार शाळांनी या उपक्रमाची आखणी केली. 
अतुलनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात मामासाहेब मोहोळ विद्यालय, स्मिता पाटील विद्यालय, मॉडर्न संकुलाचे पंडित जवाहरलाल नेहरू शाळा व यशोदीप माध्यमिक विद्यालय या चार शाळेचे हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 
मनपा स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक चित्तरंजन भागवत, माजी नगरसेवक किरण बारटक्के, सहायक पोलीस निरीक्षक सलीम नदाफ, सर्व शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक तसेच नागरीकही उपस्थित होते. यावेळी दांगट म्हणाले, की दिवाळीत दर वर्षी हवेचे प्रदूषण वाढतच आहे. ही बाब आरोग्यासाठी हितावह नसून प्रदुषणास आळा बसण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जात आहे. 
उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी काही शाळा मागील काही वर्षापासून दर वर्षी दिवाळीला संकल्प अभियान राबवीत आहेत. यावेळी मामासाहेब मोहोळ विद्यालयाचे किरण सूर्यवंशी, सुनंदा पवार संभाजी चौगुले, आनंदा दराडे, स्मिता पाटील शाळेचे संतोष तनपुरे, वैशाली चव्हाण, वैशाली खरात, मॉडर्न शाळेच्या अंजली पाठक संदीप तीरकुंडे, यशोदीप शाळेचे मंगला जावळे, नीता मुंजीकर, व्यंकटेश देशमुख, भाऊसाहेब शिंगाडे, वैशाली शिंपी, लक्ष्मण मुळे, सारिका कांबळे, योगिता फाळके, कपिल देशमुख आदी शिक्षकांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय ज्ञानेश्वर ठाकर, वंदना नवघरे, मानसी कुलकर्णी, विनायक लांबे, शकील शेख आदी उपस्थित होते. 

Web Title: We will not break the fireworks; Sworn to celebrate Diwali without pollution-free students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.