"आम्ही तुला पळवून नेऊ", अशी दमदाटी करून मुलीकडून लुटले तब्बल तीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 05:10 PM2021-04-04T17:10:01+5:302021-04-04T17:10:45+5:30

मुलगी घरात एकटी असताना घडली घटना

"We will kidnap you," he said | "आम्ही तुला पळवून नेऊ", अशी दमदाटी करून मुलीकडून लुटले तब्बल तीन लाख

"आम्ही तुला पळवून नेऊ", अशी दमदाटी करून मुलीकडून लुटले तब्बल तीन लाख

Next
ठळक मुद्देघटनेत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पिंपरी: आम्ही सोन्या काळभोर, रावण गॅंगची पोरं आहोत. आम्ही तुला पळवून नेऊन तुझ्या आईबापाकडून खंडणी मागू, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीला दमदाटी केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रोख रक्कम व दागिन्यासहित तीन लाखांचा मुद्देमाल काढून घेतला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.  रावेत येथे २७ जानेवारी ते २८ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.

प्रणव अनिल महाडिक (वय १८, रा. प्राधिकरण निगडी), आदर्श संतोष वाघमारे (वय २१, रा. गंगानगर, निगडी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून त्यांच्यासह ऋतुजा सपाटे पाटील (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पीडित १४ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून कट रचून पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेतला. आम्ही सोन्या काळभोर रावण गॅंगची पोरं आहोत. आम्ही तुला पळवून नेऊन तुझ्या आई बापाकडून खंडणी मागू, अशी धमकी देऊन, भीती दाखवून दमदाटी करून अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास दिला. मुलीच्या घरातील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन लाख ९५ हजार रुपये किमतीचे ७३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, असा एकूण तीन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल खंडणी स्वरूपात आणून देण्यास चिथावणी देऊन सदरचे कृत्य करवून घेतले. तसेच आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: "We will kidnap you," he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.