पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसारखा हरहुन्नरी, दिलखुलास व्यक्तिमत्व असणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. कालपर्यंत राजकारणात सक्रीय असणारे अजित पवार आज सकाळी या जगात नाहीत यावर कुणाचा विश्वास बसत नाहीये. हा विमान अपघात इतका भयावह होता की, मोठा स्फोट होऊन विमानाचा चक्काचूर झाल्याचे दिसून आले आहे.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
त्यावेळी विमान अपघात झाल्यावर अजित दादांचा मृतदेह ओळखून रुग्णवाहिकेत ठेवणाऱ्या मधुकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज दुपारी गावामध्ये जाताना विमान थोडे अनियंत्रित होऊन हा अपघात झाला. बोधवाडे गावामध्ये वरून गावातून खालून जवळजवळ ३०-४० फुटांच्या अंतरावरून विमान अनियंत्रित झाले होते आणि तिसऱ्या राऊंडला धावपट्टीवर लँडिंगला उतरताना तिथेच ब्लास्ट झाला. आम्ही घटनास्थळी गेल्यावर दादा आम्हाला ओळखू आले. दादांची बॉडी आम्ही डायरेक्ट अॅम्बुलन्समध्ये टाकली आणि दुसरी बॉडी एक त्यांचे पीए होते. त्यांची एक टाकली असे सहा जण टोटल असल्याचे सांगितले.
अजित पवारांचे विमान मुंबईवरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ झाले होते. तर बारामतीत ते ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात कोसळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. त्यामध्ये अजितदादांसोबत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Summary : Ajit Pawar tragically died in a Baramati plane crash, shocking Maharashtra. Witnesses identified Pawar's body at the scene. The plane crashed during landing due to a technical fault, killing all four onboard. The incident occurred after the aircraft took off from Mumbai.
Web Summary : बारामती विमान हादसे में अजित पवार की दुखद मौत हो गई, जिससे महाराष्ट्र स्तब्ध है। प्रत्यक्षदर्शियों ने घटनास्थल पर पवार के शव की पहचान की। तकनीकी खराबी के कारण विमान लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सवार सभी चार लोगों की मौत हो गई। यह घटना मुंबई से विमान के उड़ान भरने के बाद हुई।