पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आदर करायलाच हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 19:44 IST2019-09-21T19:42:55+5:302019-09-21T19:44:27+5:30
पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'व्हाय आय एम ए हिंदू ' कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आदर करायलाच हवा
पुणे : नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून पंतप्रधान झाले आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपण देशाचे पंतप्रधान म्हणून आदर आणि सन्मान द्यायलाच हवा असेही मत थरूर यांनी व्यक्त केले.
पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'व्हाय आय एम ए हिंदू ' कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याच्या भारतीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकारण हे राज्यकर्त्यांची आवड आणि कृती यात विभागले आहे. याचाच परिणाम म्ह्णून भारतात दोन टोकाचे गट निर्माण झाले असून त्यांच्यात सहिष्णुतेचा अभाव आहे. राजकारणात येण्यापूर्वी माझ्याभॊवती असणारे सुरक्षेचे कवच अचानक नाहीसे झाले आणि मी काही लोकांचे लक्ष्य झालो. आजही सोशल मीडियावर ९५ टक्के लोक हे ट्रोलर्स आहेत. आजही सोशल मीडियावरून टीका करणारे माफिया मला खुनी म्हणतात.
हिंदुत्ववादावर ते पुढे म्हणाले की, 'मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला स्वतःच्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्टय आहे. अशी संधी कोणताही इतर धर्म देत नाही. उदाहरणार्थ मी रामाला मानतो तर दुसरी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करते तर आम्ही दोघेही हिंदू ठरतो. मात्र एखादी व्यक्ती ते करत नसेल तरीही ती हिंदूच ठरते. फक्त धार्मिक नव्हे तर एकमेकांचे राजकीय विचारही मान्य करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहे.