Pune: "आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहे..."; दारू पिण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंवर गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: October 4, 2023 18:41 IST2023-10-04T18:38:49+5:302023-10-04T18:41:11+5:30

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

We just came from jail Crime against two brothers who demanded ransom for drinking alcohol | Pune: "आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहे..."; दारू पिण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंवर गुन्हा

Pune: "आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहे..."; दारू पिण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंवर गुन्हा

पुणे : दारू पिण्यासाठी आम्हाला २०० रुपये दे. आम्ही आत्ताच जेलमधून आलो आहे, आम्ही लोणीकाळभोर येथील भाई आहोत, पैसे दे नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही असे म्हणत २०० रुपयांची खंडणी मागणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक उर्फ विकी तेलंग (रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर) आणि पियुष भिसे (रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर) अशी या स्वयंघोषित भाई म्हणवणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संभाजी सोपान काळभोर (५५, रा. बाजारमळा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी काळभोर हे त्यांच्या मुलासोबत चालत जात असताना विवेक आणि पियुष त्यांच्याजवळ आहे. आणि त्यांनी दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले, तसेच पैसे दिले नाही तर सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. यावेळी संभाजी यांनी पैसे नसल्याचे सांगितले, यावर चिडलेल्या दोघा आरोपींनी त्यांच्या मुलाला मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच पियुष याने संभाजी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना देखील जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.

Web Title: We just came from jail Crime against two brothers who demanded ransom for drinking alcohol