शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:11 IST

वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती, तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते, त्यातुन तीने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. पाचही आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं.  

शिवाजीनगर कोर्टात हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला आहे. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करू असं म्हणत वकिलांनी सवाल उपस्थित केला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पडले गेले होते. त्यातुन ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असाही वकिलांनी सांगितलं आहे. तर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असं म्हणत अजब युक्तिवाद केल्याचे दिसून येत आहे. तर सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण यांची चौकशी, ५१ तोळे सोने गहाण ठेवल्याची माहिती यावर युक्तिवाद संपवला आहे. या सर्व ऐकून कोर्टाने पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद 

- आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत.- फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे‌.- आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले आहे. त्याची माहिती घ्यायची आहे.- आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचा आहे‌. 

 हगवणेंचे वकील  - पोलीस कोठडीची गरज नाही.- गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगितलेले आहे.- निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळलं. पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय.  - निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌.-  वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे.- हगवणेंच्या वकीलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न- वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातुन तीने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलाय - एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही.- आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्हाला चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला छळ करु

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCourtन्यायालयPoliceपोलिसMONEYपैसाadvocateवकिलCrime Newsगुन्हेगारी