शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही; ते काम अजित पवार पूर्ण करत आहेत - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:15 IST

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत असून आपल्या समोर धनशक्ती आहे.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. गुन्हेगारीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटले असून, दोघेही एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावरून मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाष्य केलं आहे.

सामंत म्हणाले, आपले मित्र पक्ष पत्रकार परिषद घेत आपलं काम सोपं करत आहेत. आजही त्यांची पत्रकार परिषद आहे. उमेदवारांना माझी विनंती आहे.  आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही. आपलं काम अजित पवार पूर्ण करत आहेत. आपल्याला काही बोलायची गरज नसल्याचे उमेदवारांना सांगितले आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर लढत आहे. आम्ही स्वतंत्र लढत आहोत. उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर १६ तारखेला जो निकाल लागेल. त्यावेळी महापौर बनवत असताना आपल्याला त्यांना विचारात घ्यावंच लागेल. हे शहर बाळासाहेबांच आवडता शहर होत. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाण महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. सगळीकडे आपलं वातावरण आहे. 

जनता तरुणाच्या मागे असते

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आपल्या समोर धनशक्ती आहे. आम्ही कुणावर बोलत नाही. एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. काही लोक पत्रकार परिषदेमुळे तिकडे जायचं विसरले. पण आपण सगळीकडे जाऊ. घराघरांपर्यंत पोहोचू. तीन तीन चार चार वेळा लोकांच्या घरी जाऊ. प्रचाराला लागा काम करा. काही नवे उमेदवार आपण दिले आहेत. २००४ मध्ये मी निवडणूक तरुण म्हणून लढलो त्यावेळी मी पडलो. आज पाचवेळा मी आमदार झालो आहे. म्हणून जनता तरुणाच्या मागे असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar handles criticism, we don't need to: Uday Samant

Web Summary : Uday Samant stated Ajit Pawar's actions simplify their work, eliminating the need for criticism during Pune's municipal elections. Shiv Sena is independently contesting 120 seats, aiming to leverage youth support and development agenda.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Uday Samantउदय सामंतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती