आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:05 IST2019-03-04T19:01:37+5:302019-03-04T19:05:26+5:30
आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध : पृथ्वीराज चव्हाण
पुणे : आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
चव्हाण म्हणाले, आरएसएसशी आम्ही नेहमीच भांडत आलाेय. राहुल गांधींवर तर आरएसएसने केस केली आहे. काॅंग्रेसकडून आरएसएसवर तीन वेळा बंदी घालण्यात आली हाेती. त्यामुळे काॅंग्रेस आरएसएसशी भांडत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध आहे. आम्ही त्यांना आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत कसे आणायचे याचा मसुदा तयार करण्यास सांगितले, त्यावर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस डाेळे झाकून सही करेल असे आम्ही त्यांना म्हंटले आहे. असे असताना आंबेडकर का कुरापत काढत आहेत ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच आंबेडकरांना आघाडीत येण्यासाठी दाेन प्रस्ताव पाठविल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच युतीच्या विराेधात सर्व सेक्युलर, लाेकशाही विचारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन युती विराेधात एकास एक उमेदवार उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.