भानुदास पऱ्हाड - शेलपिंपळगाव : कोरोना संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'चा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील ४९ दिवसांपासून राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने तब्बल ४८ दिवस पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. परिणामी परप्रांतीय मजुरांचे हातचे काम बंद झाल्याने परवड टाळण्यासाठी त्यांनी आपापल्या गावी पायी पळ काढला आहे. "हम तो अपने गाव पैदल जा रहे है, लेकीन फिर कभी लौट के वापस नही आएंगे अशी दु:खदायक भावना अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराने व्यक्त केली. जिल्ह्यात पिंपरी - चिंचवड, चाकण, रांजणगाव, सणसवाडी आदी ठिकाणी महत्वाच्या शेकडो औद्योगिक वसाहती आहेत. अशा वसाहतींमध्ये मॅनपॉवरही मोठ्या प्रमाणात लागत असल्याने स्थानिक कामगारांव्यतिरिक्त परप्रांतीय कामगारांची मोठी झुंड याठिकाणी कार्यरत होती. मात्र मार्च महिन्यात राज्यात कोरोना व्हायरसची साथ आली. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित करून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली.
हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:16 IST
ही दु:खदायक भावना आहे अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराची...
हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..
ठळक मुद्देपरप्रांतीय मजुरांची व्यथा : गावाला जाण्यासाठी करावी लागतेय पायपीट