शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही पोलीस आहोत, येथे मर्डर झालाय', देवदर्शनासाठी निघालेल्या जेष्ठ महिलेला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:28 IST

येथे मर्डर झाला आहे, तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून अंगावरील दागिने काढा आणि बॅगेत ठेवा, असे सांगत त्यांनी पोलिस असल्याचा बनाव केला

पुणे: आम्ही पोलिस आहोत, येथे मर्डर झाला आहे. अशी बतावणी करत चोरट्यांनी देवदर्शनासाठी निघालेल्या एका जेष्ठ महिलेच्या अंगावरील ६ लाख २४ हजार रुपये किमतीचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात महालक्ष्मीनगर वारजे येथील ६१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अविस्मरा हॉलजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला देवदर्शनासाठी निघाल्या असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहोत, येथे मर्डर झाला आहे, तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून अंगावरील दागिने काढा आणि बॅगेत ठेवा, असे सांगत त्यांनी पोलिस असल्याचा बनाव केला. चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादींनी त्यांच्याकडील दागिने बॅगेत ठेवताच चोरट्यांनी ती बॅग हातचलाखीने चोरून नेली.

या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप आरोपींचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसात शहरात पोलिस असल्याची बतावणी करून जेष्ठ महिलांना लुटल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिकMONEYपैसाfraudधोकेबाजी