पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी (एमएलआर) या दरम्यानची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे आज (रविवारी) एसएनडीटी (एमएलआर) अंतर्गत येणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी इत्यादी भागांत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एसएनडीटी परिसरातील लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिश्मा सोसायटी, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनी, कर्वे रोड झाला सोसायटी ते छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, एच. ए. कॉलनी परिसर, भरत कुंज, स्वप्नमंदिर परिसर, पटवर्धन बाग, करिश्मा सोसायटी ते वारजे वॉर्ड ऑफिस, गिरीजाशंकर सोसायटी या भागांत पाणीपुरवठा बंद राहील. तसेच चतुःशृंगी टाकी भागातील औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, डॉ. आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी, औंध गाव येथेही पाणी बंद राहणार आहे.