शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठवडयातुन १ दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड; पाणी पुरवठा विभाग आयुक्तांपुढे प्रस्ताव ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:39 IST

यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’ व ‘आयओडी’चा प्रभाव असल्याने एकूण पाऊसमान कमी असेल, असा इशारा दिला आहे

पुणे: पावसाळा उशीरा सुरु झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. महापालिकेला मंजूर असलेला पाण्याचा साठा अधिकाधिक काळ टिकावा. त्यासाठी पुणे शहरात आगामी काळात आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवाला तर १० टक्के पाणी कपात होणार आहे. शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २५ टक्के पाणी कपात होणार आहे. त्यामुळे आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा असा प्रस्ताव पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग आयुक्त नवल किशोर राम यांच्यापुढे ठेवणार आहे. त्यानंतर पाणी कपातीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज १६५० दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला १.८३ टीएमसी पाणी दर महिन्याला उचलले जाते. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आता महापालिकेला ०.२७५ टीएमसीची पाणीकपात करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’ व ‘आयओडी’चा प्रभाव असल्याने एकूण पाऊसमान कमी असेल, असा इशारा दिला आहे. त्यानुसार खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला याबाबत महिन्याच्या उचलण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात १५ टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. कितीही नोटीस आल्या तरी पुणेकरांचा एक थेंब देखील कमी होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे. या सर्व पाश्वभुमीवर महापालिकेने १५ टक्के पाणीकपात करावी, अशी नोटीस महापालिकेला आल्याचे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात अधिक आहे. मात्र पावसाळा उशीरा सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने त्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे.

तीन महिन्यात १२ दिवसाचे पाणी बचत होईल

महापालिकेने आठवड्यात एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला चार दिवसांचे पाणी वाचेल. पुढील तीन महिन्यांमध्ये १२ दिवसांचे पाणी वाचेल. यामध्ये १० टक्के पाण्याची बचत होईल. तर दिवसाआड पाणी दिल्यास २५ टक्के पाण्याची बचत होईल. त्यामुळे हे दोन्ही प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविला जाणार आहेत. त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात. याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे, असे पालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

पाणीकपातीचे नियोजन सुरु करण्यात आले असून आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा हे दोन प्रस्ताव तयार करुन ते आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेतील लोकप्रतिनिधींसमोर वस्तूस्थिती मांडून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा अंतिम निर्णय होईल . - नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Prepares for Water Cuts: One Day Off or Alternate Days?

Web Summary : Pune Municipal Corporation considers water cuts due to potential monsoon delays. Proposals include weekly shutdowns or alternate-day supply to conserve water. A final decision awaits approval from Commissioner Naval Kishore Ram and corporators, aiming for up to 25% water savings.
टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन