शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पवना, आंद्रा धरणात पाणीसाठा वाढला

By admin | Updated: June 25, 2015 03:32 IST

आठवडाभरात कोसळलेल्या पावसाने मावळ तालुक्यातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात

पिंपरी : आठवडाभरात कोसळलेल्या पावसाने मावळ तालुक्यातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ ते २४ जून या कालावधीत ४२७ मिमी पाऊस झाला आहे, तर इंद्रायणी नदीला पाणीपुरवठा होणाऱ्या आंद्रा धरणक्षेत्रातही २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाळा लवकर सुरूहोईल, असे हवामान खात्याचे भाकीत अंशत: खरे ठरले. त्यामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये असमान पाऊस होत असल्याचा प्रत्यय सुरुवातीच्या पंधरवड्यात आला. त्यामुळे काही भागात चांगला पाऊस तर दक्षिण भागातील दिवड ओव्हळे खोऱ्यामध्ये पावसाची प्रतीक्षा असे चित्र होते. परिणामी धूळवाफेवर पेरणी झालेल्या भातरोपांची उगवणही झाली नसल्याने शेतकरी काळजीत होते. दरम्यान, या आठवड्यात सलग तीन दिवस पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५३ मिमी पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे. पाणीपातळीत वाढ होऊन पाणीसाठा ११७.८५ दलघमी झाला आहे. त्यापैकी ८६.७० पाणीसाठा उपयुक्त आहे. आंद्रा धरणक्षेत्रात १ जूनपासून २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५१.६१ दलघमी पाणीसाठा असून, त्यापैकी ५१.०५ दलघमी पाणीसाठा उपयुक्त आहे. पुण्यामध्ये जूनमध्ये आजवर २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत मावळ तालुक्यात दुप्पट पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)