गुरुवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:27 PM2022-02-23T15:27:06+5:302022-02-23T15:32:42+5:30

२५ फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा...

water supply in these area of pune will be cut off on thursday | गुरुवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

गुरुवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Next

पुणे: लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील सोमवार पेठ ते नरपतगिरी चौक ते १५ ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी ( २४ फेब्रुवारी) हडपसर परिसरासह, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कोरेगाव पार्क मुंढवा भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दि़ २५ फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग :

लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर झोन मधील संपूर्ण परिसर :-  जीई साऊथ, जीई नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी

लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोन मधील संपूर्ण परिसर :- संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंडबा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कुबडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी 

Web Title: water supply in these area of pune will be cut off on thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.