गुरुवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 20:16 IST2021-11-08T20:12:41+5:302021-11-08T20:16:27+5:30
पुणे : शहरातील पुणे स्टेशन, लष्कर, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा आदी परिसराचा गुरुवार (दि. ११ नोव्हेंबर) रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा ...

गुरुवारी पुण्यातील 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : शहरातील पुणे स्टेशन, लष्कर, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा आदी परिसराचा गुरुवार (दि. ११ नोव्हेंबर) रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. १२) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. (water cut off pmc)
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर जलकेंद येथील विद्युत व पंपिंग विषय, तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे करायची असल्या कारणाने, लष्कर जलकेंद्र भागातून होणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता आदी भागांचा समावेश आहे.