शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:20 IST

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे.

ठळक मुद्देपाणी कपातीची टांगती तलवार अखेर दूर होण्याची शक्यता निर्माणशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकलपातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली

पुणे: पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या २४ तासात शहराला एक महिना पुरेल ऐवढा म्हणजे सुमारे १.५० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.  दुष्काळ परिस्थितीमुळे पुणेकरांवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून  पाणी कपातीची टांगती तलवार अखेर दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    गतवर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकलपातील सर्व चारही धरणे शंभर टक्के भरली होती. परंतु त्यानंतर झालेली कालवा फुटी प्रकरण, जिल्ह्यात पडलेला प्रचंड दुष्काळ व पाटबंधारे  विभागाचा नियोजन शुन्य कारभार यामुळे ऑक्टोबर-नोंव्हेंबर पासूनच पुणेकरांवर पाणी कपात लादण्यात आली. नोव्हेबर महिन्यांपासून पुणेकरांना एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातही धरणांचा पाणी साठा झपाट्याने कमी होत असून, पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करा, असा तगादा पाटबंधारे विभागाने लावला होता. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी कपात न करण्याची ठोस भूमिका घेतली. यामुळे पुणेकरांवरील पाणी पात टळली होती. परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पाणी पुरवठ्यासाठी चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र २८ जून पासून पुणे शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली.    खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला प्रकल्पात २८ जून रोजी केवळ २.२० टीएमसी म्हणजे ७.५२ टक्केच पाणी साठा शिल्लक होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्या झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे दहा दिवसांत पाणीसाठा २.२० टीएमसीवरून थेट ६.२५ टीएमसी झाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेल्या पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आज अखेर खडकवासला प्रकल्पात एकूण ६.२५ टीएमसी म्हणजे २१.४१ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. पुणे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महिन्याला सरासरी सव्वा टीएमसी पाणी साठा लागतो. यामुळे सध्या पुढील चार-पाच महिन्यांच्या किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. -----------------------एक दिवसांत दीड टीएमसी पाणी जमाशनिवार (दि.६) पासूनच खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. यामध्ये टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांधिक म्हणजे ६४ मि.मी, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी तर पानशेत धरणामध्ये सुमारे ३० मि.मी पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मि.मी नोंद झाली. या पावसामुळे धरणांमधील पाण्याच्या येवा झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी चारही धरणांमध्ये एकूण ४.७५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. एका दिवसात यामध्ये १.५० टीएमसीने वाढ होऊन रविवारी सायंकाळ पर्यंत हा पाणी साठा ६.२५ पर्यंत गेल्याची अधिकृत माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.-----------------------खडकवासला प्रकल्पातील धरणांतील पाणी साठ्याची माहिती (टीएमसीमध्ये)प्रकल्प           प्रकल्पीय साठा    सद्यस्थिती    टक्केवारी        पाऊसखडकवासला        १.९७                  ०.८८        ४४.५५        ९ मिमीपानशेत            १०.६५                  ३.०४        २८.५१        ३० मिमीवरसगाव            १२.८२                 २.१५        १६.७७        २१ मिमीटेमघर              ३.७१                    ०.१८        ४.९८        ६४ मिमीएकूण                 २९.१५                ६.२५        २१.४७

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणwater shortageपाणीटंचाईPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका