शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 17:45 IST

इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन दिवसात इंदापुर तालुक्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन

कळस: खडकवासला कालव्यावरील शेतीला सिंचनासाठी टेल टू हेड  या प्रचलित धोरणाप्रमाणेच पाणी देण्यात यावे.प्रचलित धोरणाप्रमाणे पाणी मिळत नसल्याने कालव्याच्या टोकावरील इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ पाणी सोडावे,अशी  मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.पाटील म्हणाले , तालुक्यातील शेटफळगढेपासुन बेडशिंगे पर्यंतच्या अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांची कालव्याला पाणी सोडण्याची मागणी आहे. त्यामुळे याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव प्रवीण परदेशी व  जलसंपदा विभागाचे पुणे अधिक्षक संजीव चोपडे यांच्याकडे ही समस्या मांडुन पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन ते तीन दिवसात इंदापुर तालुक्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या खडकवासला धरण साखळीतील कालव्यातुन नवीन मुठा कालव्यामार्फत हवेली, दौंड, इंदापूर व बारामती या चार तालुक्यात सिंचनासाठी पाणी देण्यात येते. मात्र पाणी देताना प्रचलित धोरणाप्रमाणे टेल टु हेड या पद्धतीने पाणी देण्यात नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, मदनवाडी, पोंधवडी, निरगुडे, अकोले, वायसेवाडी, धायगुडेवाडी,  कळस, पिलेवाडी,गोसाविवाडी, रुई, थोरातवाडी, मराडेवाडी, नाव्ही,डोंबाळवाडी, बोराटेवाडी, लोणीदेवकर, व्याहळी, कौठळी, बळपुडी,पोंदकुलवाडी, बिजवडी  वडापुरी, बेडशिंगे या गावातील १५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. बारामती, दौंड, हवेली तालुक्याला पाणी मिळत असताना इंदापूर तालुक्यावर अन्याय होत आहे. धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये खडकवासला (३२ %), पानशेत (४१%),वरसगाव (२९.०%),  टेमघर (२.१२%) या प्रमाणे आज पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यामुळे टेल टु हेड या पद्धतीने तालुक्याला पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.———————————

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलFarmerशेतकरीDamधरण