शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पालखीकाळातच सासवडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 3:27 PM

संतशिरोमणी ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त २८ जूनला दोन दिवसांचा मुक्काम सासवडला आहे.

ठळक मुद्देयावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई तहसील कार्यालयात बैठक सासवड परिसरातील १५ विहिरी अधिग्रहित करून त्यावर टँकर भरण्याची व्यवस्था

सासवड : संत शिरोमणी ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचा आषाढी वारीनिमित्त २८ जूनला दोन दिवसांचा मुक्काम सासवडला आहे. २५ जून रोजी पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दि. २८ जून ते १ जुलै या कालावधीत पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात असेल. यासंबंधीच्या पूर्वतयारीची प्रशासनाची बैठक नुकतीच पुरंदर तहसील कार्यालयात पार पडली.पालखी सोहळा कालावधीत सर्व विभागांनी योग्य व्यवस्थापन करावे, यासाठी तहसिलदार अतुल म्हेत्रे यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या बैठकीस सासवड, जेजुरी नगरपालिका, वाल्हे ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, भारतीय दूरसंचार निगम, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभाग, केंद्रीय महामार्ग (९६५), रेल्वे विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागांतील प्रमुख अधिकारी यांची पालखी सोहळा नियोजनाबाबत बैठक झाली.यावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सोहळाकाळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. सध्या सासवड शहराला दोन दिवसाआड वीर योजनेतून पाणीपुरवठा होतोे. गराडे व घोरवडी येथील पाणी सासवडला बंद झाले आहे. घोरवडी धरणात असणारा अल्प पाणीसाठा टंचाईसाठी राखून ठेवण्यात आला होता. तोही अल्प असल्यामुळे सासवड परिसरातील १५ विहिरी अधिग्रहित करून त्यावर टँकर भरण्याची व्यवस्था सासवड नगर परिषदेने केली आहे. परंतु, पालखी सोहळ्याच्या दोन दिवसांच्या कालावधीत किमान दीड हजार टँकर भरण्याची व्यवस्था करणे पाणीटंचाईमुळे सासवड नगर परिषदेस शक्य नाही. वीर योजनेचे पाणी या काळात सलग तीन दिवस सर्व भागास एक तास देणेसुद्धा शक्य होणार नसल्याने या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याचे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी बैठकीत सांगितले.वाल्हे येथे सोहळा काळात रेल्वे गेट बंद असते. अनेक रेल्वेगाड्या या मार्गवरून जात-येत असतात; त्यामुळे या ठिकाणी पालखीकाळात गाड्यांची संख्या या कालावधीसाठी कमी करता येईल का, याविषयी रेल्वे प्रशासनासह तातडीने बैठक घेऊन एकूणच पुरंदर तालुक्यात पालखी सोहळा कालावधीत वारकºयांना जास्तीत जास्त कशा सुविधा पुरविल्या जातील, यावर पुरंदर प्रशासन भर देणार असल्याचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी या वेळी बैठकीत सांगितले..............सासवडमधील पालखी सोहळा काळातील समस्यांवर मात करण्यासाठी सासवड नगरपरिषदेने सोहळा काळात घोरवडी जलाशयातील पाणी सासवडच्या शेटेमळ्यापर्यंत तीन दिवस सोडण्याची मागणी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्याकडे केली. शेटे मळा या ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करून या समस्येतून मार्ग काढला जाईल .- विनोद जळक, मुख्याधिकारी ........................पुरंदर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने १०८ व आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, ठिकठिकाणी तपासणी केंद्र व सुसज्ज पथक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची पालखीकाळासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी दिली. जेजुरीनगरीतदेखील पालखीचा एक दिवस मुक्काम असतो. या काळात साधारण १,२०० टँकर पाण्यासाठी येतात.सध्या जेजुरीला चार दिवसाआड मांडकी डोह योजनेतून पाणीपुरवठा होत असून नाझरे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने, मांडकी योजनेवर जास्तीत जास्त ५०० ते ६०० टँकर भरले जातील. जेजुरी येथे अधिकचे टँकर भरण्यासाठी एमआयडीसी योजनेतून सुविधा केल्यास टँकर भरण्यास सोयीस्कर जाईल, असे जेजुरी नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी या वेळी बैठकीत सांगितले.     

टॅग्स :Purandarपुरंदरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी