शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई : ८ गावे, ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी; डोक्यावरचा हंडा उतरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:58 IST

जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़

नारायणगाव - जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ज्या भागात पाणी नाही, त्या भागात महिलांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. दर वर्षी हा प्रश्न निर्माण होत असल्याने आदिवासी भागातील पाणीप्रश्न कधी संपुष्टात येणार व महिलांच्या डोक्यावरील हांडा कधी खाली येणार, अशी अपेक्षा आदिवासी बांधव करीत आहेत.जुन्नर तालुक्यातील ६५ गावे आदिवासी भागात आहेत़ पश्चिम पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे़ माणिकडोह व पिंपळगाव जोगा धरण ही आदिवासी पट्ट्यालगत येतात; परंतु आदिवासी पट्टा उंच भागात असल्याने या धरणांमधून पाणी नेणे मुश्कील आहे़ या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी भागात जलसंधारण योजना, केटीवेअर, पावसाचे पाणी बोअरवेल घेऊन त्याच भागात सोडणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, जवळवंडी, अजनावळ, आलमे, गावठाण, पिंपळगाव जोगा, आळू, डिंगोरे, घोडमाळ या गावांसह आजूबाजूच्या ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ या भागात दररोज ४ टँकर, तर कोपरे मांडवे या भागात ३ टॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या गावांव्यतिरिक्त सुकाळ वेढे, हातवीज, आंबे या आदिवासी गावांत; तर गुळुंचवाडी गावासाठी टँकरची मागणी प्रस्तावित आहे, अशी माहिती पंचायत समितीचे यांत्रिकी विभागप्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली़पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावीआदिवासी भागातील जवळपास ६० टक्के पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना ठेकेदारांनी पूर्णच केलेल्या नाहीत. मात्र, त्याची बिले अधिकाऱ्यांशी संगनमत करून काढून घेण्यात आलेली आहेत. काही पाणीपुरवठा योजना देखभालीअभावी बंद पडलेल्या आहेत़ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सर्वांत जास्त पश्न पाणीप्रश्नासंदर्भात उपस्थित करण्यात आले होते़लोकांच्या रोशाला सामोर जाऊ शकत नसल्याने अनेक अधिकारी या बैठकांना दांड्या मारत आहेत़ आदिवासी भागात झालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी, गैरप्रकार झाला असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी महासंघ जुन्नरचे अध्यक्ष तुकाराम रावते यांनी केली आहे़टँँकरची पाहावी लागते वाटजुन्या काळातील विहिरींना पावसाळ्यात पाणी असते; मात्र उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी आटल्याने महिलांना लांब त्या ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते. तसेच, या भागातील महिलांना दररोज पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते़ सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे़ या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार की नाही, अशी खंत आदिवासी बांधव करीत आहेत़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईPuneपुणे