शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाणी ओसरले अन् दिसले पाण्याखाली दडलेले मंदिर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 5:50 AM

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने तेथील नागोबा मंदिराचे दर्शन सर्वांना होत आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क, भोर (जि. पुणे) : भाटघर धरणातील पाणी कमी झाल्याने जुन्या वेळवंड (ता. भोर) येथील पांडवकालीन नागोबाचे मंदिर पाहण्यास मिळत आहे. धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला तसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुरातन मंदिरे दिसू लागली आहेत. भाविक देवदर्शन घेण्यासाठी येत आहेत.

भोरपासून १८ किलोमीटरवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यावेळी पाणलोट क्षेत्रातील गावे स्थलांतरित करण्यात आली. तरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. या गावाच्या जुन्या खुणा आजही आपल्याला पाणी कमी झाल्यावर पाहावयास मिळतात.  

प्राचीन वारसा जतन करण्याची गरज  - पांडवकालीन नागोबाचे मंदिर दहा महिने पाण्यामध्ये असते. मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे. - धरण भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे.- मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडी व वाळूमध्ये केलेले आहे. हा प्राचीन काळातील सांस्कृतिक वारसा जतन करण्याची काळाची गरज असल्याचे वेळवंड परिसरातील ग्रामस्थ सांगतात.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर