शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 14:59 IST

चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला..

ठळक मुद्देनारायण पेठेत भर दिवसाची घटना

पुणे : तहानलेल्या माणसाला पाणी द्यावे, पुण्य लागते, असे आपल्याला सांगितले जाते. त्यामुळे ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेने त्याला पाणी दिले. घरात त्या एकट्याच असल्याचे पाहून त्याचे आजींना जखमी करुन त्यांच्याकडील १ लाख रुपयांचे दागिने ओरबाडून चोरुन नेले. त्यात या आजी जखमी झाल्या. ही घटना नारायण पेठेत शनिवारी भर दिवसा सकाळी साडेअकरा वाजता घडली.याबाबत नारायण पेठेतील एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, नारायण पेठेतील योगेश्वर अपार्टमेंटमध्ये या आजी राहतात. त्या दिवसभर एकट्याच असतात. शनिवारी सकाळी त्या बाहेर गेल्या होत्या. तेथून त्या सकाळी साडेअकरा वाजता परत आल्या. घराचे कुलूप उघडून त्यात आत आल्यावर त्यांच्या पाठोपाठ एक जण आत आला व त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले़ आजींनी त्यांना पाणी दिले. पाणी पिताना त्याने सर्वत्र पाहिले तर घरात कोणी नव्हते. आजू बाजूला कोणी दिसत नाही, हे पाहून त्याने आजींच्या हातातील सोन्याच्या ४ बांगड्या जबरदस्तीने काढून घेऊन लागला. आजींनी त्याला प्रतिकार करताच त्याने त्यांना ढकलून दिले. त्या खाली पडल्यावर जबरदस्तीने त्यांच्या छातीवर गुडघा ठेवून हातातील चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज काढून नेला. आजींनी प्रतिकार केल्याने बांगड्या काढताना त्यांच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटून त्यांचा हाताला जखमा झाल्या. आजींना लुबाडल्यानंतर चोरट्याने बाहेरुन दरवाजा कडी लावून तो पसार झाला. आजी एकट्याच घरात अडकून पडल्या होत्या. सुदैवाने थोड्या वेळाने त्यांची सुन घरी आली़ तिने बाहेरील कडी उघडून घरात प्रवेश केला़ तर आत आजी पडलेल्या दिसून आल्या. त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी सुरु केली आहे. चोरट्याने पांढरट, हिरवट रंगाचा पट्ट्याचा शर्ट घातला होता. डोक्यावर टोपी घातली होती. तो साधारण ४५ ते ५० वर्षाचा होता. ही सोसायटी रस्त्यापासून आत आहे. तेथे सीसीटीव्ही नाहीत. वयामुळे आजींना चोरट्याचे वर्णनही सांगता येत नाही.शहराच्या मध्य वस्तीत भर दिवसा जबरी चोरीची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरWomenमहिलाPoliceपोलिस