येरवडा सादलबाबा चौकात फुटली जलवाहिनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:06 IST2021-02-10T15:05:58+5:302021-02-10T15:06:18+5:30
Pune News : येरवड्यातील सादलबाबा दर्गा समोरील जलवाहिनी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक फुटली.

येरवडा सादलबाबा चौकात फुटली जलवाहिनी
पुणे - येरवड्यातील सादलबाबा दर्गा समोरील जलवाहिनी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक फुटली. मोठ्या व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले होते. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे हे पाणी रस्त्याचा समोर असणारी दुकाने व इतर परिसरांमध्ये शिरले. सकाळी कामाच्या वेळात मध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. पाण्याचा प्रवाह मागे उतारावर डेक्कन कॉलेज रस्त्याकडे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वारा पासून आत मध्ये होता. सदर ठिकाणचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना घेण्यात आल्याची माहिती बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश साखळे यांनी दिली.