सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:57 IST2025-06-29T11:56:07+5:302025-06-29T11:57:08+5:30

Ajit Pawar Pune News : पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही, यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे.

Water on the steps of Sarathi Institute does not drain; PWD rushes after Ajit Pawar's arise issue in Pune Tour | सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांनी सारथी संस्थेची पाहणी केली. यावेळी सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील कामावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही, यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे, यामुळे अजित पवारांनी असे का झाले याची आपल्याला माहिती हवीय असे आदेश दिले. 

पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यावर पाणी साचले आहे. अजित पवार यांच्या पाहणीत दिसल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना तातडीने हे असे का होतेय याची माहिती देण्याचे आदेश दिले.

अजित पवारांच्या आदेशांमुळे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची पुरती तारांबळ उडाली आहे. लगेचच पीडब्ल्यूडीचे अधिकारी सारथी कार्यालयात पोहोचले असून त्यांनी या पायऱ्यांची पाहणी केली. याचबरोबर अजित पवारांनी सारथी कार्यालयाच्या कामाचा आढावा देखील मागितला आहे. 

Web Title: Water on the steps of Sarathi Institute does not drain; PWD rushes after Ajit Pawar's arise issue in Pune Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.