शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग,व्यवसाय बंद असूनही पुणे महापालिकेचा पाणीवापर तेवढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:34 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांकडून राखल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा अधिक वापर

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्प सुमारे ५ टीएमसी पाणी अधिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग ,व्यवसाय विविध सरकारी व खासगी कार्यालये बंदगेल्या काही महिन्यांत पुण्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या गेले आहे आपल्या गावी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग ,व्यवसाय विविध सरकारी व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मजूर कामगार पुण्याबाहेर जात आहेत.तरीही पुणे महानगरपालिकेच्या पाणी वापरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.पुणे महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे पालिकेची पाण्याची गरज वाढत असल्याचे दिसून येत होते. तसेच सुमारे चाळीस टक्के पाणी गळती होत असल्याचेही बोलले जात होते. मात्र,कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांत पुण्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. तसेच चहाच्या टपऱ्या, लहान-मोठे हॉटेल्स, इतर उद्योग, व्यवसाय , शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे पालिकेला लागणाऱ्या पाण्यात घट होईल, असे जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु, त्यात कोणतीही घट झालेली नाही; अजूनही पालिकेकडून खडकवासला धरणातून दररोज १४.५० ते १४.६० एमएलडी पर्यंत पाणी उचलले जात आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्प सुमारे ५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे पाऊस काही दिवस उशिरा पुण्यात दाखल झाला तरी पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यास फारशी अडचण येणार नाही. खडकवासला धरण प्रकल्प शनिवारी (दि.१६) ९.२५ टीएमसी एवढे पाणी होते. मागील वर्षी याच तारखेला प्रकल्पात केवळ ४.४९ टीएमसी एवढे पाणी उपलब्ध होते. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण २८ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. तरीही खडकवासला धरण प्रकल्पामध्ये ९.२५ टीएमसी एवढे पाणी शिल्लक आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांकडून राखल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा अधिक वापर होत असावा, त्यामुळे पालिकेच्या पाणी  वापरात घट झाली नसावी,असेही बोलले जात आहे.--------------पुणे महानगरपालिकेकडून खडकवासला धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही घट झालेली नाही दररोज सुमारे १४.५० ते १४.६० एम एल डी एवढे पाणी उचलले जात आहे. धरणातून शेतीसाठी कालव्या वाटे आवर्तन  सोडण्यात आले आहे. यंदा तिसरे ही आवर्तन सोडले जाणार आहे.-विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला ----------पुण्याच्या विविध विविध भागांमध्ये सुमारे दीड लाख स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अभ्यास करतात.त्यातील केवळ दोन ते अडीच हजार विद्यार्थी आता पुण्यात वास्तव्यास असतील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच कमी झाले आहे, असे एमपीएससी स्टुडंट्स राईट्स विद्यार्थी संघटनेचे महेश बडे यांनी सांगितले.----------खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा

खडकवासला - १.१२ टीएमसी (६५.८२ टक्के)पानशेत - ४.३८ टीएमसी (४१.१६टक्के)वरसगाव ३.७४ टीएमसी (२९.२०टक्के)टेमघर -००.०० टीएमसी (००.००टक्के)

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका