मुलींना अंघोळ करताना पाहतोय बिनधास्त; पोलिसांकडून नराधमाला पकडण्याचं नुसतंच आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:47 IST2022-09-23T13:46:57+5:302022-09-23T13:47:10+5:30
पुण्यात चंदीगडप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.

मुलींना अंघोळ करताना पाहतोय बिनधास्त; पोलिसांकडून नराधमाला पकडण्याचं नुसतंच आश्वासन
शिवणे : शिवणे येथील अहिरे गेट भागात एक मुलगा सकाळच्या वेळी परिसरात फिरून त्या भागातील घरामध्ये डोकावून महिलांना तसेच मुलींना आंघोळ करताना पाहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून अशा घटना घडत असून काही जणांनी या मुलाला घरात डोकावत असताना रंगेहाथ पाहिले आहे. त्या मुलाला कोणी काही बोलले तर तो लज्जा निर्माण होईल असे कृत्य करत असल्याचे महिलांच्या वतीने सांगण्यात आले.
गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी देखील अशीच एक घटना घडली असून मुलाला पकडुन जाब विचारला असता त्याने स्वतःचे संपूर्ण कपडे काढुन सर्वांसमोर निर्वस्त्र झाला. त्यामुळे महिलांना लज्जा येऊन कोणीही तेथे थांबले नाही. सदर प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेले असता माहिती घेतली असून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आले.
काही दिवसापूर्वीच पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. चंदिगढ मधील घटना ताजी असतानाच पुण्यात त्याप्रमाणेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.