शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या बदल्यासाठी वाशिंबेकरांची हत्या

By admin | Updated: March 26, 2015 23:02 IST

नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील ५ जणांना इंदापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता अटक केली.

इंदापूर : नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील ५ जणांना इंदापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता अटक केली. या पाचही आरोपींना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. सोन्या ऊर्फ अमोल सोनटक्के याच्या नाना ग्रुपचे हे सर्व जण म्होरके आहेत. सोन्या सोनटक्केच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच त्यांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ अंकुश मधुकर गायकवाड (वय २६, रा. यशवंतनगर इंदापूर), दीपक अभिमान साळुंखे (वय २४, रा. पंचायत समितीच्या पाठीमागे, इंदापूर), नागेश बापू गायकवाड (वय २८, दत्तनगर, इंदापूर), राहुल दत्तात्रय लंबाते (वय २८, रा. इरिगेशन वसाहत, इंदापूर), रवी वसंत भिसे (वय ३०, रा. इंदापूर), अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामतीचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील हवालदार शिवाजी निकम, संजय जगदाळे, अशोक पाटील, पोलीस नाईक मारुती हिरवे, बाळू भोई, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, सहायक फौजदार ज्ञानेश्वर साळुंखे, पोलीस शिपाई सदाशिव बंडगर यांनी ही कामगिरी केली.विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी दीपक साळुंखे यांच्याशी फिर्यादी महावीर लोंढे याची झटापट झाली. त्यावेळी साळुंखे यांस कोयता लागून जखम झाली आहे.सोन्या सोनटक्के याच्या खुनामुळेच वाशिंबेकर यांची हत्या करण्याच्या हेतुनेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्या आधी तीन, चार दिवस त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. बाजारातून कोयते खरेदी करण्यात आले होते. आरोपी रिक्षातून बाबा चौकात आले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.पाचही आरोपी सर्वसाधारणपणे २४ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. अंकुश गायकवाड, नागेश गायकवाड हे दोघे जण रिक्षा चालवितात. दीपक साळुंखे हा वेल्डर आहे. रवी भिसे चालक असून राहुल लंबाते हा काही काळ हॉटेल चालवत होता. सोन्या सोनटक्के हा त्या सर्वांचा म्होरक्या होता. (वार्ताहर)सोन्या सोनटक्केच्या खुनाचा घेतला बदलाइंदापूर न्यायालयासमोरच्या चौकात २६ नोव्हेंबर २००६ रोजी रात्री सोन्या सोनटक्के याची हत्या झाली होती. त्याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून धनंजय वाशिंबेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते या प्रकरणात तीन वर्षे तुरुंगात होते. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, वाशिंबेकरांना संपवायचेच असे या आरोपींनी ठरवले होते. इंदापुरातील व्यवहार सुरळीतबुधवारी (दि. २५) इंदापूरकरांनी बंद पाळल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवा ग्रुपने शहर बंद पुकारला. वाशिंबेकरांचे खुनी जोपर्यंत सापडत नाहीत, तोपर्यंत बंद ठेवण्याचा त्यांचा निर्धार होता. मात्र, सकाळीच पाच आरोपी पोलिसांनी गजाआड केले. त्याचबरोबर बंद मागे घेण्याचा आदेश पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिला. त्यामुळे दुपारी दीडनंतर शहरातले सारे व्यवहार सुरू झाले. आरोपींना ८ दिवस कोठडीइंदापूर : धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत. आज सायंकाळी चारच्या सुमारास वाशिंबेकर खून प्रकरणातील आरोपी अंकुश मधुकर गायकवाड, दीपक अभिमान साळुंखे, नागेश बापू गायकवाड, राहुल चंद्रकांत लंबाते, रवी वसंत भिसे यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात इंदापूर न्यायालयात आणण्यात आले. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश पी. एल. घुले यांनी आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.