सरकारी डॉक्टरने वॉर्डबॉयला लोखंडी सळईने केली बेदम मारहाण, डॉक्टरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 13:05 IST2021-11-16T12:50:27+5:302021-11-16T13:05:16+5:30
राजगुरुनगर: चांडोली ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरने वार्डबॉयला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिथुन मोहन अडसुळ (रा. ...

सरकारी डॉक्टरने वॉर्डबॉयला लोखंडी सळईने केली बेदम मारहाण, डॉक्टरवर गुन्हा दाखल
राजगुरुनगर: चांडोली ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरने वार्डबॉयला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिथुन मोहन अडसुळ (रा. न्यु सांगवी, पिंपळे गुरव) असे मारहाण झालेल्या ब्रदरचे नाव आहे. डॉक्टर केशव गुट्टे (रा. मोशी) यांच्यावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन अडसुळ वार्डबॉय म्हणून चांडोली रुग्णालयात कार्यरत आहे. अडसुळ हे कोव्हीड वार्डमध्ये नाईट डयुटीवर होते. कोव्हीड वार्डच्या गेटजवळ अडसुळ उभे असताना चांडोली रुग्णालयात नेमणुकीस असलेले डॉक्टर केशव गुट्टे व त्यांच्या इतर मित्रांनी अडसुळ यांना हाताने, लाथाबुक्याने व लोखंडी सळईने मारहाण केली. या मारहाणीत अडसुळ यांचा उजवा हात मोडला आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.