भिंत आणि झाड कोसळून गाड्यांचे नुकसान, महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:09 IST2018-07-10T20:08:48+5:302018-07-10T20:09:07+5:30
शहरातील शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज जवळ अचानक रस्त्यालगतची सिमाभिंत व बाभळीचे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.

भिंत आणि झाड कोसळून गाड्यांचे नुकसान, महिला जखमी
पुणे : शहरातील शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज जवळ अचानक रस्त्यालगतची सिमाभिंत व बाभळीचे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.या घटनेत एक महिला जखमी झाल्या आहेत. या झाडामुळे तीन चारचाकी आणि दोन मोटार सायकलींचेही नुकसान झाले असून अग्निशमन दलाने हे झाड बाजूला केले आहे.हर्षदा कुलकर्णी असे संबंधित महिलेचे नाव आहे.
शहरात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सगळं पडणाऱ्या पावसाच्या ओलीने जुनी झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. हे झाड कोसळण्यामागेही तेच कारण असल्याचे सांगितले जाते. साधारण दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच कसबा अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांनी कोसळलेले झाडाचा धोकादायक भाग उपकरणांच्या साह्याने दुर करुन धोका दूर केला. तसेच त्यांच्या मदतीला महापालिका उद्यान विभागाचे कर्मचारी देखील होते. हे झाड पडल्याने जोरात आवाज झाला तेव्हा गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे लक्षात आले अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी दिली.