शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पाण्यासाठी अडीच किलोमीटरवर पायपीट

By admin | Updated: May 1, 2016 02:49 IST

नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील कुडली बुद्रुक येथे पाणीपुरवठ्याची कोणतीच योजना राबवली गेली नाही. त्यामुळे जवळपास कुठेच पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने

भोर : नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील कुडली बुद्रुक येथे पाणीपुरवठ्याची कोणतीच योजना राबवली गेली नाही. त्यामुळे जवळपास कुठेच पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली आहे. महिलांना गावापासून अडीच किलोमीटरवर असलेल्या ओढ्यात ढवरा, खड्डा खोदून त्यातून पाणी भरून डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे.पाण्याअभावी पुरुष व महिलांसह मुला-बाळांचे व जनावरांचे मोठे हाल होत आहेत. हे वर्षानुवर्षे सुरू असून याकडे मात्र लोकप्रतिनिधींसह शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र अद्याप टँकरच सुरू झालेला नाही. भोर शहरापासून ४० किलोमीटरवर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नीरादेवघर धरण भागातील डोंगरउतारावर वसलेल्या कुडली बुद्रुक गावात सुमारे ६० घरांची ३७५ लोकांची वस्ती आहे. पावसाळ््यात डोंगरउतारावरून येणाऱ्या झऱ्यातून पाण्यावर आपली तहान भागवतात. गावात शासनाची कोणतीच पाणीपुरवठा योजना राबवलेली नाही. एक बोअरवेल आहे. मात्र उन्हाळ््यात तिला पाणीच नसते. त्यामुळे दर उन्हाळ््यात मार्च ते जूनपर्यंत चार महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. गावाच्या जवळपास कुठेच पाण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गावापासून सुमारे अडीच किलोमीटर खाली असलेल्या ओढ्यात लोकांनी एक ढवरा काढला असून त्यासाठी माजी सभापती रणजित शिवतरे यांनी मदत केली आहे. या ढवऱ्यावरून पाणी भरून महिलांना घेऊन जावे लागत आहे. काही जण पिक-अप जीपच्या मदतीने विकत पाणी घेऊन जात आहेत. कुडली बुद्रुक गावाच्या हद्दीत छोटे पाटबंधारे विभागाकडून सुमारे २० लाख रुपये खर्चून बंधारा बांधण्याचे काम सुरू मात्र या बंधाऱ्यामुळे कुडली बुद्रुक व कुडली खुर्द या दोन्ही गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा बंधारा कुडली बुद्रुक येथील ओढ्यात बांधला असता तर गावातील नागरिक पाणी पीत असलेल्या ढवऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला असता आणि गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असता. त्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात अशी लोकांची भावना आहे. कुडली बुद्रुक गावापासून अडीच किलोमीटरवर ओढ्यात ढवरा खोदून त्यातून पाणी घेऊन जाताना महिलांचा फोटो पाठवला आहे.शासनाकडून टंचाईग्रस्त गावात पाण्याची टंचाई आहे किंवा नाही, याची पाहणी करून नंतरच टँकर सुरू केला जाणार आहे. मात्र याला किती वेळ जाणार आणि टँकर कधी सुरू होणार, हे सांगता येत नाही. त्यामुळे महिलांना अजून किती दिवस भटकावे लागणार आहे, हे सांगता येत नाही. कुडली बुद्रुक येथे जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा योजना करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे तरच टंचाई दूर होणार आहे.