शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी फिरती शाळा

By admin | Updated: June 4, 2015 05:24 IST

पोटाचे खळगे भरण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी जाणारे व रक्ताचे पाणी करून स्वत:चे व मुलाबाळांचे पोट भरणारे कष्टकरी हंगामी

विशाल विकारी, लोणावळापोटाचे खळगे भरण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कामासाठी जाणारे व रक्ताचे पाणी करून स्वत:चे व मुलाबाळांचे पोट भरणारे कष्टकरी हंगामी कामगारांच्या मुलांची शिक्षणाविना परवड होऊ नये, याकरिता वयाच्या सत्तरीनंतरही झटणारा एक अवलिया लोणावळयात आहे़ धिरूभाई टेलर (हासमुखभाई) असे त्यांचे नाव आहे़लोणावळा, तसेच आजुबाजूच्या परिसरात दर वर्षी कामानिमित्त शेकडो कुटुंबे वेगवेगळ्या राज्यांतून व प्रांतांतून येत असतात़ काम असेपर्यंत ही मंडळी कामाच्या ठिकाणी राहतात. काम पूर्ण झाले की, पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात़ गाव व घर सोडून ही मंडळी जागोजागी फि रत असतात़ त्यांना कसलेही व्यवहारज्ञान नाही की, साधी अक्षरओळखी नाही़ हीच स्थिती त्यांच्या मुलांची आहे़ मात्र आई-वडिलांच्या नशिबी जे जगणे आले, ते मुलांच्या वाट्याला येऊ नये, मुले शिकावीत मोठी व्हावीत, किमान त्यांना व्यवहार ज्ञान यावे, तसेच अक्षर व शब्दांची ओळख व्हावी, याकरिता धिरूभाई यांनी या मुलांना शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे़ गवळीवाडा, तसेच शहराच्या कोणत्याही भागात अशी कामगारांची कुटुंबे आली की, धिरूभाई त्यांची भेट घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे काम करतात़ याकरिता त्यांनी ‘ब्राईट फ्युचर कौटुंबिक फिरती मोफत शाळा’ ही शाळा सुरू केली आहे़ या शाळेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी हे कामगार राहतात, त्यांच्या पालाच्या ठिकाणी जाऊन ते विद्यार्थ्यांना शिकवतात.