वालचंदनगर पोलिसांनी जप्त केला धारदार शस्त्रसाठा; एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:36 IST2021-04-27T22:35:22+5:302021-04-27T22:36:47+5:30
मोटारसायकलवरून धारदार शस्र घेऊन जाणारा आरोपीला पोलिसांनी पकडले.

वालचंदनगर पोलिसांनी जप्त केला धारदार शस्त्रसाठा; एकजण ताब्यात
कळस: वालचंदनगर येथुन दहा घातक धारदार हत्यारे मोटारसायकलवरुन घेवुन जाणारा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आरोपी सचिन गंधारे यांस दुचाकीसह ताब्यात घेवून वालचंदनगर पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन वालचंदनगर रोडवर एक संशयित दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवर काहीतरी पार्सल घेवुन येत असल्याचे दिसल्याने त्यास थांबवुन त्याचेकडील पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये १० धारदार शस्रे मिळुन आली आहेत. हा व्यक्ती वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील रेकॉडवरील गुन्हेगार सचिन गंधारे ( रा.शेळगाव ता.इंदापुर) हा आहे.
या आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेवुन त्याला अटक केली असुन त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये शस्र अधिनयमानुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,
अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहीते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,उपनिरीक्षक अतुल खंदारे,पोलिस हवालदार प्रकाश माने, प्रविण वायसे,अमोल चितकोटे यांनी पार पाडली.