शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

प्रतिक्षा संपली, ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 20:21 IST

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत.

ठळक मुद्देपुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन : पहिल्या टप्यात २५ बस धावणारपुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणारई-बसचे तिकीट दर इतर नियमित बस एवढेच सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार

पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत. इतर बसच्या तिकीट दराप्रमाणेच या बसचे तिकीट दर असल्याने प्रवाशांना कमी पैशांमध्ये आरामदायी प्रवास करता येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन करण्यात आले आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणार आहेत. सुरूवातीला प्रजासत्त्ताक दिनी पुणेकरांच्या सेवेत या बस आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळेत बस न आल्याने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यांपुर्वी ताफ्यात १० बस रुजू झाल्या. या बसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने मागील काही दिवस बस आगारांमध्येच उभ्या होत्या. अखेर शनिवारी पहिल्या टप्प्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बसचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. ई-बसचे तिकीट दर इतर नियमित बस एवढेच असतील. तसेच सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार आहेत. वातानुकुलित व आरामदायी बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. एकुण सात मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यातील चार मार्ग पुण्यातील तर तीन मार्ग पिंपरी चिंचवडमध्ये आहेत.-------------पुढील आठवड्यात नियमित संचलनसध्या पीएमपीला १० बस मिळाल्या असून शनिवारपर्यंत उर्वरित बस मिळण्याची शक्यता आहे. तसेच केवळ दहा बसचीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सर्व बस मार्गावर येण्याची शक्यता कमी आहे. याबाबत अद्याप नियोजन झालेले नाही, असे पीएमपीतील अधिकाºयांनी सांगितले. उर्वरित १५ बसची नोंदणी पुढील आठवड्यात होऊ शकते. त्यानंतरच या बस मार्गावर येतील. तोपर्यंत उपलब्ध बस ठरावित मार्गांवर सोडण्यात येतील. 

या मार्गावर धावणार ई-बस १. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३ बस - ६फेºया - ९६वारंवारिता - २० मिनिटे२. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपाबस - २फेºया - २०वारंवारिता - ४५ मिनिटे३. निगडी ते भोसरीबस - २फेºया - ४८वारंवारिता - ६० मिनिटे४. हडपसर ते पिंपळे गुरवबस - ३फेºया - ६०वारंवारिता - ३० मिनिटे५. भेकराईनगर ते न. ता. वाडीबस - ३फेºया - ४८वारंवारिता - ४५ मिनिटे६. भेकराईनगर ते पुणे स्टेशनबस - ३फेºया - ५४वारंवारिता - ३० मिनिटे७. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३बस - ३फेºया - १८वारंवारिता - ६० मिनिटे..............................------------अशी असेल ई-बस- वातानुकुलित- आरामदायी बैठक व्यवस्था- आसनक्षमता - ३१- मोबाईल चार्जिंगची सुविधा- पॅनिक बटन- सीसीटीव्ही- इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) - तीन तासात बॅटरी चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर अंतर धावणार- एका युनिटमध्ये ३ किलोमीटर अंतर धावणार- प्रदुषण कमी होणार------------------------ 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल