अविनाश थोरात पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, राष्ट्रवादीमधूनच शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सलग तीन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. २००९ पासून राष्ट्रवादीच्या विधानसभेतील ताकदीतही घट होऊ लागली आहे. तीन आमदारांवरून २०१४ मध्ये केवळ एकच आमदारावर राष्ट्रवादीचे बळ आले आहे.
२०१४ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळे लढले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील केवळ खेडमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. परंतु, युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हडपसर आणि शिरूर येथील दोन आमदारांचे बळही त्यांना मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या भोसरीच्या महेश लांडगे यांचीही समजूत काढण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. मात्र, ही सगळी ताकद कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात त्याचे मतांत रूपांतर होईल का, याबाबतशंका आहे.
राष्ट्रवादीचा एकच आमदार असला तरी मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये राष्टÑवादीची ताकद आहे. याशिवाय २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत पक्षांतर्गत गटबाजीचा फटका राष्टÑवादीला बसला होता.हे टाळल्यास राष्टÑवादीचे उमेदवारडॉ. अमोल कोल्हे लढत देऊशकतील. कॉँग्रेसची या मतदारसंघात फार ताकद नाही.हडपसर वगळताइतरत्र त्यांचा प्रभाव नाही. मात्र, हडपसर आणि भोसरी येथीलमतदान निर्णायक ठरणार आहे.शहरी भागातील मतदारांनाआकर्षित करण्यात कोण उमेदवार यशस्वी ठरतोय, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
2014
शिवसेना59.05%राष्ट्रवादी31.35इतर9.80