शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘होय मी सावरकर बोलतोय’नाटकाचे पुण्यात स्वेच्छा प्रयोग होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 15:13 IST

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर गीताला नुकतीच 111 वर्ष पूर्ण झाली.

ठळक मुद्देप्रयोगांची सुरुवात २० डिसेंबरपासून होणार; प्रेक्षकांसाठी केलेला हा पहिलाच उपक्रम ठरणार

पुणे : ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या जाज्वल्य शब्दांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांची मातृभूमीविषयीची उत्कटता प्रतीत होणाऱ्या अजरामर गीताला नुकतीच( 10 डिसेंबर) 111 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताबरोबरच नऊ महिन्यानंतर नाट्यगृहांचा पडदा उघडला असताना पुन्हा प्रेक्षकांची पावले नाट्यगृहाकडे वळावीत या दुहेरी हेतूकरिता पुण्यात ‘होय मी सावरकर बोलतोय’ हा नाटकाचा स्वेच्छा मूल्य प्रयोग होणार आहे. हे नाटक प्रेक्षकांसमोर विनामूल्य सादर होणार असून, रसिकांनी त्यांना शक्य होतील आणि योग्य वाटतील तितकेच पैसे प्रयोगाच्या नंतर द्यावेत अशी ही अभिनव संकल्पना आहे. या नाटकाच्या स्वेच्छा मूल्य प्रयोगांची सुरुवात २० डिसेंबर पासून पुण्यनगरीत होणार आहे. प्रेक्षकांसाठी केलेला हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.

काही नाटकांचे या पूर्वीही असे प्रयोग आपल्याकडे झाले आहेत; मात्र लॉकडाऊन नंतर प्रेक्षकांनी नाटकाला यावं यासाठी हे प्रयोग स्वेच्छा मूल्य करण्याचे धाडस अभिजात प्रॉडक्शन या संस्थेने दाखविले आहे. याविषयी निर्माता व अभिनेता आकाश भडसावळे म्हणाले, मुळातच काही दोन ते चार नामांकित संस्था व त्यांची नाटके वगळता लॉकडाऊन  नाटकांना काही फार प्रेक्षक वर्ग होता असे नाही. नाट्य व्यवसायापेक्षा नाट्य कला जिवंत रहावी असं मला वाटतं. म्हणून 'व्यवसाय' हा शब्द बाजूला काढून निव्वळ 'नाटक करायचं' या उद्देशाने आम्हा सगळ्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

असं असलं तरीही आर्थिक बाजूचा विचार माझ्या सारख्या छोट्या निर्मात्याला करावाच लागतो. जेव्हा 'नाटकाला प्रेक्षक नाही' अशी ओरड आम्ही सगळे करतो, तेव्हा अशा विचित्र परिस्थितीत नाटक उभं रहावं आणि प्रेक्षकांना नाटकाला खेचून आणावं या दोन्हींच्या उद्देशातून पुन्हा एकदा सावरकर नाटक करून 'स्वेच्छा मूल्य' सादर करूया हा विचार डोक्यात आला. आमची सावरकर नाटकाची संपूर्ण टीम माझ्या पाठीशी याही स्थितीत उभी राहिली. आज यांच्यामुळे असं धाडस करण्याचं बळ येतं. सावरकर नाटकाला खरं तर निमित्ताची आवश्यकता नाही. परंतु तरीही एक सुरेख योगायोग जुळून आला तो 'सागरा प्राण तळमळला' च्या शतकोत्तर एकादश पूर्तीचा! सध्या मुंबई-पुण्यात व नंतर इतरही ठिकाणी असे प्रयोग करण्याचा मानस आहे. नाटक व्यवसाय पूर्ववत होईपर्यंत आम्ही असे प्रयोग करत राहू.

या नाटकात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, पृथ्वीराज कपूर, सुभाषचंद्र बोस, मॅडम कामा, डॉ. आंबेडकर, म. गांधी अशा भूमिका असून, त्यात अनुक्रमे बहार भिडे, विजय पाटील, नरेंद्र कुलकर्णी, कविता नाईक, सुमित चौधरी, प्रसाद संगीत आणि आकाश भडसावळे हे कलाकार काम करीत आहेत. हे नाट्य प्रयोग दि. 20 डिसेंबरला दुपारी १२:३० रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड तर सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहेत.--------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरTheatreनाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या