शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सातव्या दिवशीच्या गणरायाला वाजतगाजत निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 9:46 PM

गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाऱ्या गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले.

पुणे: गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाऱ्या गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भाविकांनी श्री गणेशाला निरोप दिला. महापालिकेने शहरातील १८ घाटांवर २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली असून नदीपात्र तसेच अन्य ठिकाणीही लोखंडी हौद विसर्जनासाठी म्हणून उपलब्ध करून दिले आहेत.

    विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत. घाटांवर तर पथकेच तयार ठेवण्यात आली आहे. पाचव्या दिवशी गौरीबरोबरच विसर्जीत होणाऱ्या गणपतींची संख्या जास्त असते. त्या तुलनेत सातव्या दिवशी विसर्जीत होणार गणराय संख्येने कमी असतात. त्यामुळे घाटांवर फारशी गर्दी नव्हती. बहुसंख्य गणपती घरगुती असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य वाजतगाजत घाटांवर दुपारपासूनच येत होते. गणपतीची स्वारी घाटावर विसर्जनासाठी आली की त्यांना आरती करण्यासाठी म्हणून महापालिकेने टेबलची व्यवस्था करून दिली आहे. नदीपात्रात मुर्ती विसर्जीत केल्यास नदीचे पाणी प्रदुषीत होते, प्लॅस्टर आॅफ पॅरिस पासून तयार केलेल्या मुर्तींमुळे नदीचे पाण्याती झरे बंद होतात, त्यामुळेही पर्यावरणप्रेमी मुर्तीचे नदीत विसर्जन करू नये असा प्रचार गेली काही वर्षे करत आहेत. त्याचा परिणाम दरवर्षी वाढतच चालला असल्याचे दिसते आहे.

    नदीपात्रात विसर्जीत होणाऱ्या मुर्तींची संख्या अजूनही जास्त असली तरीही हौदांमध्ये विसर्जीत करण्यालाही अनेक कुटुंबांकडून प्राधान्य देण्यात येते. वृद्धेश्वर, लकडी पूल, अष्टभूजा, सूर्य हॉस्पिटल, पटवर्धन घाट, आपटे घाट अशा बहुसंख्य घाटांवर हौदांमध्ये मुर्ती विसर्जन करण्याचा प्रतिसाद मिळत होता अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे व सुनिल मोहिते यांनी दिली. रात्री उशीरापर्यंत विसर्जन सुरू होते असे ते म्हणाले.शहरातील सर्व विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी असलेले मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘कुठेही घाई गर्दी करू नये, भाविक काय म्हणतात ते नीट ऐकावे, नदीपात्राकडे लहान मुलांना जाऊ देऊ नये अशा सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हौदातील विसर्जनही नीट करून घ्यावे, त्याकडे लक्ष ठेवावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.’’

पालिका अखेरच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्जमहापालिका आता अखेरच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे. सर्व घाटांवरील कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रांजवळ जीवरक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सीसीटीव्हीवर विसर्जनाचे चित्रण होईल. त्यावर लक्ष ठेवण्यास स्वतंत्र कर्मचारी आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून रात्रीच्या वेळेसही घाटांची त्वरीत स्वच्छता करण्यात येत आहे. अखेरच्या दिवशीपर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यरत राहील.- ज्ञानेश्वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवnewsबातम्या