शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट गावे अद्यापही ‘विकासा’च्या प्रतीक्षेत; करवसुली मात्र जोऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 12:56 IST

पाणी- ड्रेनेजसाठी सुरु आहे संघर्ष : कर वसुली मात्र जोरात

ठळक मुद्देगावे समाविष्ट करण्यापुर्वी विकासाचे नियोजन केले जाणे आवश्यक या गावांमधून सव्वाशे कोटींच्या आसपास मिळकत कर अपेक्षित

पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना तीन वर्षांपासून ‘विकासा’ची प्रतिक्षा असून अद्यापही या गावांमधील नागरिकांचा पाणी आणि ड्रेनेजसाठीच संघर्ष सुरु आहे. यासोबतच अनधिकृत बांधकामांमध्ये प्रचंड वाढ झाली असून पालिका गावातील विकासाची कामे कधी हाती घेणार आणि त्याला दृश्य स्वरुप कधी प्राप्त होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.       राज्य शासनाने पालिकेच्या हद्दीमध्ये 2017 साली 11 गावांचा समावेश केला.  ही गावे पालिकेच्या हद्दीत येण्यापुर्वीपासूनच याठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु झाली होती. जिल्हा आणि शहराच्या सीमेवर असलेली ही गावे गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाची असल्याने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. स्वस्तात घरे मिळत असल्याने अनेकांनी याभागात घरे घेतली. त्यामुळे या गावांमधील लोकसंख्याही वाढली. या गावांमधील जमिनीचे दर गगनाला भिडले. याकडे पीएमआरडीए आणि पालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले.       

त्यामुळे सार्वजनिक वापरासाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. तुरळक ठिकाणी अशा जागा शिल्लक आहेत. या सर्व प्रकारामुळे पालिकेचे बांधकाम शुल्काम अधून मिळणारे उत्पन्न बुडाले. पीएमआरडीएने बांधकामांना परवानग्या दिल्यामुळे पालिकेला आता या गावांमधून मिळकत कराव्यतिरिक्त अन्य महसूल मिळणे कठीण आहे.समाविष्ट गावांमध्ये पालिकेकडून मिळकत कराची वसुली सुरु करण्यात आलेली आहे. या गावांमधून सव्वाशे कोटींच्या आसपास मिळकत कर अपेक्षित आहे. परंतू, त्या तुलनेत या गावांमध्ये विकास कामे मात्र अद्याप सुरु झालेली नाहीत. या गावांकरिता नगरसेवकांची निवडणूक घेण्यात आली. नगरसेवक  निवडूनही आले. परंतू, अवघ्या दोन नगरसेवकांना या गावांना न्याय देणे कितपत शक्य आहे असा प्रश्न आहे. या गावांमधील नागरिकांच्या पाणी आणि ड्रेनेजसंबंधी असलेल्या अपेक्षाही पालिका मागील तीन वर्षात पूर्ण करु शकलेली नाही.===== पालिकेकडून 2013 मध्ये 33 गावांचा समावेश करण्याबाबत ठराव करुन राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठविला होता. राज्य शासन वेळेत निर्णय घेत नसल्यामुळे ग्रामस्थ न्यायालयात गेले.  शासनाने पहिल्या टप्प्यात 11 गावे आणि उर्वरित तीन वर्षात उर्वरीत गावे घेण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये एकही गाव महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाले नाही.=====पालिकेच्या ठरावाचा सत्ताधारी भाजपाने अवमान केला असून तत्कालीन भाजपा सरकारने उर्वरीत गावे पालिकेच्या हद्दीत घेतली नाहीत. हा न्यायालयाचा अवमान आहे. पालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर या गावांच्या विकासाला खीळ बसला. गावांच्या विकासासाठी अंदाजपत्रकातील तरतुदीचा निधी वर्गीकरणाद्वारे पळविण्यात आला. हा निधी या गावांच्या विकासावर खर्च झाला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते.- चेतन तुपे, आमदार ====गावे समाविष्ट करण्यापुर्वी विकासाचे नियोजन केले जाणे आवश्यक आहे. विकासासाठी आवश्यक असलेला निधी, कर्मचारी, पाणी याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.- पृथ्वीराज सुतार, शिवसेना=====समाविष्ट गावांच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध आहे. उर्वरीत गावे घेण्यासही विरोध नाही.  गावांचा विकास आराखडा होणे गरजेचे असून या गावांचा पूर्ण विकास झाल्यानंतरच उर्वरीत गावांचा विचार राज्य शासनाने करावा.- मुरलीधर मोहोळ, महापौर

टॅग्स :PuneपुणेTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcommissionerआयुक्त