शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बारागाव मावळ परिसरातील गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मार्गसनी : किल्ले राजगडकडे जाणाऱ्या साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असल्याने बारागाव मावळ परिसरातील गावांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मार्गसनी : किल्ले राजगडकडे जाणाऱ्या साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असल्याने बारागाव मावळ परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तर धानेप जवळ असलेला फुल देखील पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरती असणारे कर्नवडी गावाच्या जवळ असलेल्या डोंगराला मागील वर्षी भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे या गावास धोका संभवतो म्हणून या गावास पाहणी करण्यासाठी तहसीलदार शिवाजी शिंदे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार गुप्त विभागाचे प्रमुख अभय बर्गे गेले असता कर्नवडी गावाला जोडणाऱ्या दरीमध्ये जास्त पाणी आल्याने त्यांना गावांमध्ये जाता आले नाही. परंतु फोनवर संपर्क केल्यानंतर येथील लोक सुरक्षित असल्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी सांगितले. वेल्हे तालुक्यात गेली पाच दिवस पावसाने थैमान घातले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील वेल्हे, केळद आणि पानशेत घोल मार्ग मोकळा झाला आहे. अतिवृष्टीमुळे जाधववाडी येथे दरड कोसळून रस्ता काही काळ बंद होता. मात्र, तहसीलदार शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय सपकाळ, पोलीस निरीक्षक मनोज पवार आदी अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत भर पावसात दरड रस्त्याच्या बाजुला करत मार्ग मोकळा केला. पानशेत घोल रस्त्यावर ठीकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या येथील जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सतर्कतेने घटनास्थळी जाऊन दरडी बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत पानशेत आणि घोल मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. गुंजवणी धरणातून पाणी सोडल्याने कानंदी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर राजगडाकडे जाणारा साखर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला आहे. धानेप जवळ असलेला पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे विहीर, निवी, घिसर, अंत्रोली परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

फोटो साठी : केळद रस्ता ठिकाणी रस्ता खचलेला आहे तर रस्त्यावरील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे.