Baramati: बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त; छापा टाकून पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 18:28 IST2023-06-13T18:24:26+5:302023-06-13T18:28:23+5:30
शहर पोलिसांनी छापा टाकत एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तलवारी जप्त केल्या...

Baramati: बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त; छापा टाकून पोलिसांची कारवाई
बारामती :बारामती शहरातील आमराई भागात शहर पोलिसांनी छापा टाकत एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तलवारी जप्त केल्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांनी रविवारी (दि. ११) नेहल ऊर्फ रावण विजय दामोदर (वय २३, रा. वडकेनगर, आमराई, बारामती) याच्या घरी छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरातून एक गावठी पिस्तूल, एक मॅगझिन व एक जिवंत काडतूस तसेच पाच धारदार तलवारी मिळून आल्या. दामोदर याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
त्याला सोमवारी येथील न्यायाधीश अण्णासाहेब गिरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, अक्षय सिताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले आदींनी कारवाई केली. दामोदर याने हे पिस्तूल व तलवारी का बाळगल्या होत्या, पिस्तूलचा वापर झाला आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
महाडिक यांनी शहर व परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती कोणाकडे असल्यास पोलिस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.