शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

विजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 12:00 PM

गेल्या वर्षी कोरेगाव भीमाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस ठाण्याचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरु झाल्या आहेत़.

ठळक मुद्दे विजयस्तंभाला दरवर्षी २ ते ४ लाख भाविक अभिवादन करण्यासाठी येतात़ तिन्ही पोलीस दल एकत्रितपणे परस्परांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलणार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी लाखो भाविक येत असतात़. गेल्या वर्षी कोरेगाव भीमाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्याचा त्याअगोदर पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरु झाल्या आहेत़. १ जानेवारीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तिन्ही पोलीस दल एकत्रितपणे परस्परांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलत आहेत़. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ आॅगस्ट २०१८ रोजी करण्यात आली़. त्याचबरोबर ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. मात्र, या प्रस्तावाला अजून मंजूरी मिळालेली नाही़. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली होती़. त्यानंतर दुसऱ्या  दिवशी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल झाली होती़. यात नक्षलवाद्यांचा हात असून एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांकडून पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे़. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेरणेफाटा येथे हा विजयस्तंभ येतो़. लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे या अगोदरच्या नियोजनानुसार २६ जानेवारीला पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याचे शासन पातळीवर निश्चित केले जात होते़. मात्र, १ जानेवारीच्या विजयस्तंभाला होणाऱ्या गर्दीचा विचार करुन ते त्या अगोदर पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या आहेत़. याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले की, विजयस्तंभाला दरवर्षी २ ते ४ लाख भाविक अभिवादन करण्यासाठी येतात़. लोणीकंद पोलीस ठाणे पुणे पोलीस दलात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे़ मात्र, शासनाकडून प्रत्यक्ष आदेश येईलपर्यंत त्यावर बोलता येणार नाही़. गेल्या वर्षी जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ तसा कोणताही प्रकार होऊ नये, यासाठी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ग्रामीण पोलीस एकत्रितपणे परस्परांशी समन्वय साधून आवश्यक तो बंदोबस्त तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहेत़. सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे हे दोन्ही पोलीस दलाशी त्याबाबत समन्वय साधत आहेत़.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार