शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

प्रेयसीवर बलात्कार करुन काढला व्हिडिओ, निलंबित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:46 PM

पुणे पोलीस दलाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवून सुमारे दहा दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचा-याविरुद्ध अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी पटेल या महिलेला देत होता.

पुणे : पुणे पोलीस दलाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवून सुमारे दहा दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचा-याविरुद्ध अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी पटेल या महिलेला देत होता.

असिल कादर पटेल (रा.भवानी पेठ पोलीस लाईन), सनी सुरेश डिंबर (रा. म्हाडा कॉलनी, शाहु कॉलेज रोड) आणि चिराग त्रिवेदी (म्हाडा कॉलनी, दत्तवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २००९ पासून सुरु होता. एका पार्टीमध्ये या महिलेची असिफ पटेल याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आपण एचबीसी येथे रिकव्हिरी अधिकारी असल्याचे सांगितले. 

पटेल याने या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्याची व्हिडिओ क्लिप काढून ती सोशल मिडियावर व्हायरल करतो, असे सांगून पुन्हा वेळोवेळी शारिरीक संबंध करु धमकी दिली. या महिलेकडून पैसे घेऊन गेला. या महिलेच्या पतीला तिच्या जातीविषयी तिरस्कार निर्माण केला. तेव्हा तिच्या पतीने ही महिला व तिच्या घराच्याविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. असिफ पटेल याने काढलेला व्हिडिओ चिराग त्रिवेदी याने पॉर्न साईटवर अपलोड केला. असिफ पटेल हा कॉलगर्ल सप्लाय, गांजा, कोकीन व इतर बेकायदेशीर कामे करीत असून हुक्का पार्लरचे हप्ते जमा करीत असल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

या महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायदा  आणि अनुसुचित जाती जमामी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा