Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:10 PM2023-10-10T18:10:59+5:302023-10-10T18:20:28+5:30

भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे.

Video: Pune's Satyam praised by Fadnavis; The glory of tricolor before Khalistani, proud moments viral video | Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान

Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान

पुणे - ब्रिटनमध्ये भारताच्या तिरंग्याचा अवमान पाहताच भारतीय तरुणाने तिरंगा ध्वजाला उचलून स्वत:जवळ घेत शान राखली. ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून होत असलेल्या विरोधाचे प्रदर्शनादरम्यान भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला होता. मात्र, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील सत्यम सुराणाने धाडसी बाणा दाखवत तिरंग्याचा सन्मान अबाधित ठेवला. जमिनीवर पडलेला झेंडा तो पोलिसांसमोर आपल्या हाताने उचलून घेतो. सत्यम सुराणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे कौतुक केलंय.

भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी, एका पोलीस अधिकाऱ्याचा पायही तिरंगा ध्वजावर पडल्याचे पाहायला मिळते. या विरोध प्रदर्शनास्थळी जाऊन सत्यम सुराणाने जमिनीवर पाडलेला तिरंगा ध्वज उचलून घेत भारताची शान राखली. सत्यमचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सत्यम हा पुण्यातील रहिवाशी असून ज्या मतदारसंघात राहतो, तेथील आमदार सुनिल कांबळे यांनीही सत्यमच्या धाडसाचं कौतुक केलंय. तसेच, सत्यमसह त्याच्या आई-वडिलांशीही फोनवरुन संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व पुणेकरांसाठी आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही ते म्हणाले. 


सुनिल कांबळे हे कंटोनमेंट मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ शेअर करत सत्यमचा आम्हाला अभिमान वाटतो, असे म्हटले आहे. 

Web Title: Video: Pune's Satyam praised by Fadnavis; The glory of tricolor before Khalistani, proud moments viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.