Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:25 IST2025-07-31T17:24:54+5:302025-07-31T17:25:34+5:30
आपण दोघेही एका खटल्याच्या संदर्भात न्यायालयात एकत्र आला आहात. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारला.

Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही
इंदापूर : शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या निमित्ताने इंदापूर न्यायालयात आलेले माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे न्यायालयात एकाच सोफ्यावर बसले; मात्र त्यांनी एकमेकांच्या नजरेला नजर भिडवली नाही. पत्रकारांशी बोलताना मात्र राजू शेट्टी यांनी सदाभाऊंवर निशाणा साधला.
आपण दोघेही एका खटल्याच्या संदर्भात न्यायालयात एकत्र आला आहात. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारला. उत्तरादाखल ''सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल असे मला वाटत नाही'', असा टोला शेट्टी यांनी लगावला.
शेतकरी संघटनेतील मतभेदांमुळे आधीच या दोन्ही नेत्यांमधील संबंध ताणलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या प्रसंगामुळे पुन्हा शेतकरी संघटना व नेत्यांचे मतभेद हा मुद्दा चर्चेत येईल का. राजकीय वर्तुळात घडामोडी घडतील का, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.