शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: पीएमपी बस चालकाची मस्ती; ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव लावला टांगणीला

By नितीश गोवंडे | Updated: October 22, 2023 15:43 IST

कार चालकासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चिडलेल्या बस चालकाने बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत कारला धडक

पुणे: शहरात पीएमपी बसद्वारे नागरिकांना स्वस्तात परिवहन सुविधा पुरवली जाते. मात्र अनेकदा पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत नागरिकांची वादावादी होत असते. याचे प्रमुख कारण पीएमपीच्या लोकांची दादागिरीची भाषा हे असते. कार चालकासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चिडलेल्या पीएमपी बस चालकाने बेदरकारपणे बस रिव्हर्स घेत कारला धडक देण्याच्या नादात बसमधील ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला लावला. या घटनेमुळे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची आठवण पुणेकरांना झाली. ही घटना सेनापटी बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ घडली. पीएमपी चालक निलेश ज्ञानेश्वर सावंत (३१, रा. वारजे माळवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक निलेश सावंत त्याच्या ताब्यातील कोथरूड डेपोची पीएमपी बस घेऊन शनिवारी (२१ ऑक्टोबर) रोजी एनडीए गेट ते सेनापती बापट रस्तामार्गे चिंचवड कडे जात होता. बस दुपारी एकच्या सुमारास एस. बी. रस्त्यावर आलेली असताना एका रुग्णालयाजवळ त्याने वाकडी-तिकडी बस चालवली. त्यामुळे एका कारला घासून ती पुढील चौकात गेली. या घटनेमुळे कारचालक आणि निलेश सावंत यांच्यात वाद झाला. याच कारणावरून चिडलेल्या निलेशने त्याच्या ताब्यातील बस थेट रिव्हर्स घेत बस मागे असलेल्या ३ वाहनांना धडक दिली. त्यानंतर तो बस पुन्हा पुढील चौकापर्यंत घेऊन गेला. चालकाच्या या कृत्यामुळे घाबरलेल्या बसमधील प्रवासी महिला बसमधून वाचवण्यासाठी ओरडत असल्याचे देखील  व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी हे करत आहेत. पीएमपी प्रशासनाने देखील निलेश सावंत याच्यावर तात्काळ कारवाई करत त्याला कामावरून कमी केले असल्याचे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकAccidentअपघातpassengerप्रवासीPoliceपोलिस