शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

Video: मेट्रो धावली अन् पुणेकरांची सकाळ गोड झाली; अजित पवारांनी दाखवला हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 09:00 IST

Pune Metro Run: भारतीय बनावटीचे अँल्यूम्यूनियम कोच. भारतात प्रथमच पुण्यात वापर, जाणून घ्या पुणे मेट्रोचं वैशिष्टं..

ठळक मुद्देपुण्याला काहीही कमी पडू देणार नाही. अनेक प्रकारची विकासकामे भविष्यात प्रस्तावितउपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणेकरांना ग्वाहीपंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्प सुरू झाला - चंद्रकांत पाटील

पुणे: कोणतेही राजकारण न आणता पुण्याला देशातील सर्वोत्तम, सुरक्षित शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचा हा ट्रायल रन पुण्याचे स्वप्न पुर्ण करणारा ठरेल अशी ग्वाही ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या वनाज ते आनंदनगर या अंतराची चाचणी आज पवार यांच्या प्रमुख ऊपस्थितीत झाली.  विधानपरिषदेच्या ऊपसभापती डॉ. निलम गोर्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, प्रकल्प संचालक प्रकल्प अतूल गाडगीळ यावेळी ऊपस्थित होते.

पवार म्हणाले, सरकार कोणाचे आहे हे जनता ठरवते. निवडणूकीनंतर विकास महत्वाचा या विचाराने सगळे एकत्र येऊन काम करतो आहोत. पुण्याला काहीही कमी पडू देणार नाही. अनेक प्रकारची विकासकामे भविष्यात प्रस्तावित केली आहेत. ७५ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील द्रुकश्राव्य माध्यमातून सहभागी होते. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्प सुरू झाला. कोरोनामुळे खीळ बसेल असे वाटले होते, मात्र मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा ठेवला. अधिकारी, कर्मचारी यांंनी अडथळे दूर करत काम केले. महापौर मोहोळ म्हणाले, राज्यातील सर्वात मोठी महापालिका पुणे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचा मोठा वाटा असेल. पुण्याला ही संधी मिळवून देण्यात सर्वांचाच सहभाग आहे. 

गोऱ्हे म्हणाल्या, जमीनीवरून की भूयारी या वादात अडकलेली मेट्रो पुण्यात अखेर सुरु झाली. पुण्यातील विलंबाची कसर या कामातून भरून निघाली. महिलांसाठी मेट्रो खास सुरक्षित सेवा आहे. दीक्षित यांनी प्रास्तविक केले. पुण्यातील पहिल्या ३ किलोमीटरची चाचणी घेताना अभिमान वाटतो असे ते म्हणाले. ३ वर्षात काम पुर्ण झाले. त्यातले एक वर्षे कोरोनातच गेले. मेट्रो कामाचा त्रास सहन करत असल्याबद्दल दीक्षित यांनी पुणेकरांना धन्यवाद दिले. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थानिक नगरसेवक अर्पणा वरपे, वैशाली माथवड ऊपस्थित होते. योगेश देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले. संचालक अतूल गाडगीळ यांनी आभार व्यक्त केले. मेट्रोच्या कामाची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आली.

पुणे मेट्रोची वैशिष्ट्येभारतीय बनावटीचे अँल्यूम्यूनियम कोच. भारतात प्रथमच पुण्यात वापर३ कोचमध्ये ९५० पेक्षा जास्त प्रवासीपँनिक बटण ची खास व्यवस्थामहिलांसाठी विशेष बोगीअपंगांना व्हील चेअर

नियमांचे पालन व्हायला हवे. आमच्यावर नाही, पण संयोजकांवर गुन्हे दाखल होतात. दीक्षितांवर गून्हा नको दाखल व्हायला, म्हणून काळजी घेतली. सकाळी कार्यक्रम का असा प्रश्न पडेल. मेट्रोच्या कामाचा त्रास पुणेकरांना होतच आहे. आणखी त्रास नको म्हणून सकाळी घेतला कार्यक्रम असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोAjit Pawarअजित पवार